इनफिनिक्सने गुरुवारी भारतात त्यांचा हॉट एस ३ एक्स हा बजेट स्मार्टफोन लाँच केला असून हा फोन खास सेल्फी लव्हर्ससाठी डिझाईन केल्याचा दावा केला आहे. या फोनला १६ एमपीचा एआय सेल्फी कॅमेरा दिला गेला असून या फोनची किंमत आहे ९९९९ रुपये. येत्या १ नोव्हेंबरपासून तो फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होत आहे.
इन्फिनिक्सचा हॉट एस ३ एक्स बजेट स्मार्टफोन लाँच
कंपनीच्या म्हणण्यानुसार कमी प्रकाशात देखील उत्तम प्रतीचे फोटो सेल्फी कॅमेरयाने घेता येणार आहेत. या कॅमेऱ्याला फेस अनलॉक फिचरही दिले गेले असून केवळ ०.३ सेकंदात तो अनलॉक होतो. फोनला ६.२ इंची डिस्प्ले, ३ जीबी रॅम, ३२ जीबी मेमरी, १३ एमपी आणि २ एमपीचे ड्युअल रिअर कॅमेरे, अँड्राईड ओरिओ ८.१ ओएस दिली गेली असून हा फोन ४ जी ला सपोर्ट करतो. फोन ला ४ हजार एएमएच बॅटरी असून ती दोन दिवसाचा बॅकअप देते असेही कंपनीचे म्हणणे आहे.