सुरु होतेय अंबानी यांची जिओ पेमेंटस बँक

payment
रिलायंस उद्योगसमूह लवकरच जिओ पेमेंटस बँकेची सुरवात करत असून त्यासाठी आवश्यक त्या नेटवर्क आणि इन्फ्रास्ट्रक्चर टेस्टिंगच्या बिटा चाचण्या सुरु झाल्या आहेत. या चाचण्या यशस्वी झाल्या कि लगेच जिओ पेमेंटस सेवा लाँच केली जाणार आहे. रिलायंस जिओच्या स्ट्रॅटीजी व प्लानिंगचे प्रमुख अंशुमन ठाकूर यांनी हि माहिती पत्रकारांना दिली.

ठाकूर म्हणाले जिओच्या नेटवर्क आणि इन्फ्रास्ट्रक्चर टेस्टिंगच्या बिटा चाचण्याना व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिओ हि देशातील पेमेंटस बँक परवाना मिळालेली आठवी बँक असून हि सेवा सुरु करणारी पाचवी बँक आहे. यापूर्वी एअरतेल, पेटीएम, इंडिया पोस्ट, फिनो पेमेंट याची सेवा सुरु झाली आहे. या सेवेसाठी रिलायंसने एसबीआय बरोबर करार केला आहे.

रिझर्व बँकेने देशातील तळागाळातील जनतेपर्यंत बँकिंग सेवा पोहोचावी यासाठी २०१३-१४ मध्ये पेमेंट बँक मॉडेल कल्पना मांडली होती. या बँकेत ग्राहक १ लाख रु. पर्यंत रक्कम ठेव म्हणून ठेवू शकतात.

Leave a Comment