खूप काही पाहायचे असेल तर चला शिवपुरीला

shivpuri
मध्य प्रदेशातील शिवपुरी हे ठिकाण पर्यटन नगरी म्हणून प्रसिद्ध असून खूप काही पाहिल्याचे समाधान ज्यांना हवे असेल त्यांनी येथे आवर्जून भेट दिली पाहिजे. अर्थात त्यासाठी किमान ४ ते ५ दिवसांचा वेळ हवा. या नगरीत आणि आसपास इतके काही पाहण्यासारखे आहे कि डोळ्यांना ती भक्कम मेजवानी ठरते.

या गावाला निसर्गाचे वरदान आहे. पाहावे तेथे झरे आणि नजर जाईल तेथपर्यंत हिरवळ आहे. पावसाळ्यात हे सौंदर्य अधिकच खुलते. समुद्रसपाटीपासून ७५२ मीटर उंचीवर हे ठिकाण आहे त्यामुळे सिंदिया राज्याची हि उन्हाळी राजधानी बनली. याला मिनी सिमला असेही म्हटले जाते.

kund
येथील भादैया कुंद, भुरा खो, टून्डा भरका, भरकाखो, पवा फॉल आणि सुलतान गढ पावसाळ्यात फारच आकर्षक रूप घेतात. देखणा माधव विलास पॅलेस सर्वाना पाहण्यासाठी खुला नसला तरी बाहेरून त्याचे रूप न्याहाळता येते. या गावाचा संबंध १८५७ च्या स्वतंत्र बंडाशी आहे. येथे जेल बराक दोन मध्ये स्वतंत्रसेनानी तात्या टोपे यांना १८ एप्रिल १९५९ मध्ये फाशी दिली गेली. ते आता संरक्षित राष्ट्रीय स्मारक आहे. येथे तात्या टोपे यांची मुर्तीही पाहायला मिळते.

chatari
या नगरात ताजमहाल प्रमाणे अनेक सुंदर इमारती आहेत. सिदिया परिवाराच्या छतरी आवर्जून पाहाव्या अश्या. त्यात आई आणि मुलाच्या प्रेमाचे प्रतिक मानली जाणारी छतरी विशेष महत्वाची. पहिले माधवराव यांनी आईच्या स्मरणार्थ छतरी बांधली आणि माधवरावांच्या निधनानंतर त्याच्या आईच्या समोरच त्यांचे स्मारक उभारले गेले. शिवपुरीपासून २८ किमीवर राजा नल आणि दमयंती यांचे नरवर गाव असून २२ किमी वर सूरवाया गढी आहे. येथे पांडव अज्ञातवासात असताना राहिले होते असे सांगितले जाते. येथेच एक प्रचंड जाते असून ते भीमाचे असल्याचे म्हणतात.

Leave a Comment