संबळच्या लाकडी शिट्ट्यांचा परदेशात आवाज बुलंद

whistle
उत्तर प्रदेशातील संबळ या गावात वर्षानुवर्षे प्राण्यांच्या शिंगापासून आणि हाडांपासून बनविल्या जात असलेल्या अनेक आकर्षक हस्तकला वस्तू जगात प्रसिद्ध आहेत. मात्र सर्वात महत्वाची बाब म्हणजे येथे हाताने म्हशी, रेडे याच्या शिंगापासून बनविल्या जाणारया लाकडी शिट्ट्याना जगातून मागणी येत असून विशेषतः विश्व फुटबॉलशी जोडलेल्या जर्मनी सह अनेक युरोपीय देशातून या शिट्ट्या घुमू लागल्या आहेत. फुटबॉल रेफ्री पासून ते पाळीव प्राण्यांना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांना या शिट्ट्या अतिशय भावल्या आहेत.

आत्तापर्यंत ४ वेळा फिफा कप जिंकणारा जर्मनी आणि अन्य देशातील फुटबॉल मैदानांवर आता याच शिट्या वापरल्या जात आहेत. या शिट्ट्यांचा आवाज दमदार आहेच पण या शिट्ट्या मजबूत आणि टिकाऊ आहेत. जर्मनीतून कानपूर येथील ३ कंपन्यांकडे या शिट्ट्यांसाठी ऑर्डर नोंदविली गेली आहे. दर महिना १० ते १५ हजार शिट्ट्याना मागणी येत असल्याचे समजते.

shitti
येथे पारंपारिक कारागीर अतिशय मेहनतीने मृत प्राण्यांच्या शिंगे आणि हाडांपासून अनेक आकर्षक वस्तू बनवित आहेत. शिट्टी बनविणे हे महा किचकट काम आहे आणि किमान १५ ते १७ वेळा तिच्यावर वेगवेगळे कारागीर काम करतात. सर्वात मोठी शिटी ८.५ सेंटीमीटरची असते तर छोटी ६.५ सेंटीमीटरची असते. एका शिट्टीसाठी उत्पादन खर्च ५० ते ८० रुपये येतो. परदेशात पोचेपर्यंत तिची किंमत २०० ते ८०० रुपये होते. त्यासाठी प्रथम शिंग वळवून त्याचे तुकडे केले जातात. तोंडात घातल्यानंतर कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून रासायनिक प्रक्रिया केली जाते आणि मग शिट्टी बनविली जाते. या शिट्ट्या दिसायलाही अतिशय आकर्षक आहेत.

संबळ मध्ये शिट्ट्याबरोबर बटणे, चष्मे आणि सजावटीचे अनेक प्रकारचे समान तयार केले जाते.

Leave a Comment