जगप्रसिद्ध पुष्कर मेळ्याच्या तयारीला सुरवात

mela
राजस्थानानातील पुष्कर या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्वाच्या स्थळी दरवर्षी कार्तिक पौर्णिमेपासून सुरु होणारया जगप्रसिद्ध पुष्कर मेळ्याची तयारी सुरु झाली आहे. येथे यावेळी देशातील सर्वात मोठा पशु बाजार भरतो आणि त्यातही हा उंटाचा मोठा बाजार मनाला जातो. येथे यावेळी राजस्थानच्या रिती रिवाज, परंपरा, खाद्यविशेष, दागिने, रंगीबेरंगी कपडे, अनेक हस्तकलेच्या अतिशय सुंदर वस्तू विक्रीसाठी असतात आणि जगभरातून पर्यटक या जत्रेला हजेरी लावतात.

brahma
पुष्कर येथे सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव याचे देशातील एकमेव मंदिर असून या जत्रेला त्यामुळे धार्मिक महत्वही आहे. येथे येणारे भाविक येथील पवित्र सरोवरात स्नान करून बह्मदेवाचे दर्शन घेतात.

pushkar
पशु बाजारात उन्टाबरोबर घोडे आणि अन्य पशु विक्रीसाठी येत असले तरी सर्वाधिक संखेने उंट असतात. येथे उंटांच्या सौंदर्यस्पर्धा भरविल्या जातात तसेच शर्यतीही लावल्या जातात. येथे नर्तक, जादुगार, गायक, गारुडी असे अनेक कलाकार याच्या कलेचे प्रदर्शन करतात आणि हा एकूणच सारा आनंद सोहळा असतो.

Leave a Comment