फ्लिपकार्ट, अॅमेझॉनने ५ दिवसांच्या सेलमुळे कमावले तब्बल १५ हजार कोटी

combo
फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि अन्य ई कॉमर्स कंपन्यांनी गेल्या आठवड्यात सेल आयोजित केला होता. ग्राहकांना यामध्ये अनेक ऑफर्ससोबत कॅशबॅकची सुविधाही मिळत होती. पण ग्राहकांचा या सेलमुळे किती फायदा झाला हे माहित नाही पण या सेलमुळे ई कॉमर्स कंपन्या चांगल्याच मालामाल झाल्या आहेत.

अभूतपूर्व प्रतिसाद या कंपन्यांच्या सेलला मिळाल्याचे समोर आले आहे. ई कॉमर्स कंपन्यांना जवळपास पाच दिवस आयोजित केलेल्या या सेलमध्ये तब्बल १५ हजार कोटी रुपयांचा नफा झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात RedSeer consulting ने एका सर्वेक्षणाद्वारे माहिती दिली असून ९ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान RedSeer consulting च्या रिपोर्टनुसार ई कॉमर्स कंपन्यांना १५ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत ६४ टक्के जास्त फायदा झाला असून या कंपन्यांचा फायदा दरवर्षी वाढतच आहे. या कंपन्यांना गेल्या वर्षी १० हजार ३२५ कोटींचा फायदा झाला होता.

Leave a Comment