बँक ऑफ बडोदाच्या रोखपालाने जाळल्या दहा लाखांच्या नोटा

cash
श्रीरामपूर : तब्बल दहा लाख रुपयांचा नोटा बँक ऑफ बडोदाच्या रोखपालाने जाळून टाकण्याचा प्रकार उघडकीस आला असून त्याने नोटा जाळल्यानंतर शॉर्ट शॉर्टसर्किने आग लागल्याचा बहाणा केला. ही घटना नेवासे तालुक्यातील सलाबतपूर येथे घडली आहे.

दि. २५ सप्टेंबर रोजी ही घटना बँक ऑफ बडोदाच्या नेवासा तालुक्यातील सलाबतपूर शाखेत घडली होती. पण नेवासे पोलीस ठाण्यात याप्रकरणी तब्बल एक महिन्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आल्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे. या प्रकरणी बँकेतील रोखपाल रमेश बाजीराव वाघ (रा. साईसिटी, नेवासा फाटा, नेवासा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल बद्रिनाथ सोनवणे (रा. नवीन चांदगाव, ता. नेवासा) यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बँक ऑफ बडोदाच्या सलाबतपूर शाखेत वाघ हा रोखपाल म्हणून काम करतो. बँकेतील १० लाख १२ हजार ४३५ रुपयांच्या भारतीय चलनातील नोटा त्याने स्वत: जाळून टाकल्या. परंतु, त्या नोटा शॉर्टसर्किट होऊन जळून गेल्याचा बहाणा केला. बँकेचे नुकसान करण्याच्या हेतूने रोखपालाने हा प्रकार केला. नेवासा पोलिस ठाण्यात रोखपाल रमेश वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भिंगारे हे करीत आहेत.

Leave a Comment