हॉनर मॅजीक २ स्मार्टफोनला सहा कॅमेरे?

magic2
चीनी स्मार्टफोन उत्पादक हुवाईची सबब्रांड कंपनी हॉनर त्यांचा नवा स्मार्टफोन मॅजीक २ ३१ ऑक्टोबरला सादर करत आहे. त्याचा टीझर पूर्वीच प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यातून कंपनी फ्लॅगशिप प्रोसेसर किरीन ९६० चा वापर या फोनसाठी करणार असल्याचे दिसून आले आहेच. मात्र या फोनच्या नव्याने लिक झालेल्या फोटोत चीनी अभिनेत्री झाईनेलिया झाओच्या हातात असेलेल्या या फोनच्या रिअर साईडवर तीन कॅमेरे दिसत आहेत.

वेबसाईट टेना वर हा फोन लिस्ट केला गेला असून तेथे दिल्या गेलेल्या माहितीनुसार या फोनला एकूण सहा कॅमेरे दिले जातील. पैकी रिअरला १६+२४+१६ चा ट्रिपल कॅमेरा तर फ्रंटला १६+२०+२ चा ट्रिपल कॅमरा असेल. या फोनला ६.३९ इंची डिस्प्ले, ८ जीबी रॅ, आणि १२८ जीबी स्टोरेज असून ३४०० एमएएचची बॅटरी आहे. तसेच फिंगरप्रिंट सेन्सर आणि थ्री डी फेस सेन्सरहि दिला गेला आहे.

Leave a Comment