मुकेश अंबानींची पॉड टॅक्सी व्यवसायात उडी

podtaxi
रिलायंस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी नेहमीच वेगळी वाट चोखाळणारे उद्योजक मानले जातात. जिओच्या अभूतपूर्व यशानंतर आता ते नव्या व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहेत. अंबानी आता टॅक्सी कंपनी स्थापण्याच्या हालचाली करत असून या भारतातल्या पहिल्या पॉड टॅक्सी प्रोटोटाईप साठी जागेच्या शोधात असल्याचे समजते. अंबानी यांनी यासाठी स्कायट्रान नावाच्या कंपनीबरोबर करार केला आहे.

या पॉड टॅक्सी सेवेची संकल्पना रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी २०१६ मध्ये मंडळी होती आणि २०१७ मध्ये त्याला नीती आयोगाने मान्यता दिली आहे. या सेवेसाठी तीन कंपन्या उत्सुक आहेत त्यात अंबानी आघाडीवर आहेत. पुढच्या पिढीची वाहतूक यंत्रणा असे म्हटले जात असलेल्या या सेवेत विनाचालक टॅक्सी आकाश तसेच जमिनीवरून मॅग्नेटिक आधारित निश्चित मार्गावरून धावतात. त्याला पर्सनल रॅपिड ट्रान्झीट असेही म्हटले जाते. यातील कार्सचे काही भाग अमेरिकेतून आयात केले जाणार आहेत तर बाकी भारतात बनविले जाणार आहेत असेही समजते.

गेल्या आठवड्यात रिलायंसने अमेरिकन टेक्नोलॉजी कंपनी स्कायट्रान मधील १२.७ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. या सेवेत दोन्ही बाजूच्या १ किमी मार्गासाठी १०० कोटी खर्च येतो आणि हा खर्च सेवा देणाऱ्या कंपन्यांनी करायचा आहे असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment