मी टू शब्द १२ वर्षापूर्वी आला जन्माला

metoo
आज देश विदेशात महिला लैगिक शोषणाला वाचा फोडणारे मी टू अभियान वादळ जोरात घोंगावते आहे. मात्र हा शब्द १२ वर्षापूर्वी अमेरिकन महिला तराना बुर्क या सामाजिक कार्यकर्तीने प्रथम वापरला आणि त्यानंतर २०१७ मध्ये हॉलीवूड अभिनेत्री एलिया मिल्नो हिने या नावाने कॅम्पेन सुरु केले तेव्हा जगभरात वापरला जाऊ लागला असे प्यू रिसर्च संस्थेच्या पाहणीत दिसून आले आहे.

या संस्थेच्या पाहणीप्रमाणे आज दररोज ५५ हजार ३१९ ट्वीट मी टू शी संबंधित असतात आणि गुगलने मीटू शब्द शोध ट्रेंड दाखविणारी वेगळी साईट सुरु केली आहे. विशेष म्हणजे शनिवारी घेतलेल्या या साईट सर्च शोध अहवालानुसार भारतातील पाच छोटी गावे या शब्दाचा सर्च घेण्यात आघाडीवर असून त्यात महाराष्ट्रातील डोंबिवलीचा समावेश आहे. अन्य गावात छत्तिसगढ मधील भंवरोली, उत्तराखंड मधील रुद्रपुर, झारखंड मधील बोकारो आणि ओडीसा मधील ब्रह्मपूर या गावांचा समावेश आहे.

१२ वर्षापूर्वी तराना बुर्क हिने २००६ मध्ये न्युयोर्क मधील एका पिडीत मुलीशी बोलताना तू एकटीच लैगिक शोषणाची शिकार नाहीस तर मीही म्हणजे मी टू या अनुभवातून गेले आहे असे सांगून तिला धीर दिला होता आणि तेव्हा हा शब्द प्रथम वापरला गेला. २०१७ मध्ये या नावाने सोशल मिडीयावर जेव्हा कॅम्पेन सुरु झाले तेव्हा अभिनेत्री एलियाने लैगिक शोषणाच्या तुम्ही शिकार असाल तर मी टू असे उत्तर द्या असे आवाहन केले आणि त्याच्या दुसर्या दिवशी ५ लाख ट्वीट झाले असा या अभियानाचा इतिहास आहे.