शहराच्या कानाकोपऱ्यात मिळणार मोफत वायफाय

wifi
मोबाईल इंटरनेट युजर्ससाठी एक चांगली बातमी असून पुढील वर्षापासून शहरांच्या गल्ली बोळात सुद्धा मोफत वायफाय सेवेचा लाभ युजर घेऊन शकणार आहेत. टेलिकॉम क्षेत्रातील खासगी कंपन्या देशभरात १० लाखाहून अधिक वायफाय हॉटस्पॉट सुरु करणार आहेत. विशेष म्हणजे या स्पॉटवरून इंटरनेट एक्सेस करताना रीव्हेरीफीकेशनची गरज राहणार नाही. सध्या सार्वजनिक वायफाय साठी एके ठिकाणी लॉग इन केल्यावर जर युजरचे लोकेशन बदलले तर दुसरया ठिकाणी पुन्हा लॉग इन करावे लागते. ती गरज यापुढे पडणार नाही.

भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया, रिलायंस जिओ, बीएसएनएल या कंपन्या देशात लाखोंच्या संखेने वायफाय हॉटस्पॉट तयार करणार आहेत. सध्या रेल्वे स्टेशन, विमानतळ, मॉल्स, अश्या ठिकाणी अशी केंद्रे आहेत. सेल्युलर ऑपरेटर असोसीएशनकडे सर्व टेलिकॉम कंपन्यांनी असे स्पॉट तयार करण्याची तयारी दाखविली आहे. बीएसएनएल ने यापूर्वीच ४ कोटी ४० लाख हॉटस्पॉट १०० पेक्षा अधिक देशात विदेशी कंपन्यांच्या सहकार्याने सुरु केले आहेत. आता बाकीच्या खासगी कंपन्या देशात १० लाखाहून अधिक स्पॉट तयार करत आहेत.

यामुळे मोबाईल नेटवर्क वरचा ताण कमी होणार असून युजरना अधिक चांगला स्पीड मिळणार आहे. दोन वर्षात मोबाईल नेटवर्क डेटा युजर्सची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. बीएसएनएल विदेशी कंपन्यांच्या मदतीने जी हॉटस्पॉट सेवा पुरविते आहे त्यासाठी अक्सेस अॅप डाऊनलोड करावे लागते आहे. सार्वजनीक वायफाय युजरला १५ रु. ते १०० रु. टॉप करावे लागतात. त्यात पहिली १५ ते ३० मिनिटे मोफत वायफायचा लाभ घेता येतो.

Leave a Comment