व्हर्टूचा नवा स्मार्टफोन अॅस्टर पी, बेसिक किंमत ३ लाख रु.

vertu
व्हर्टू कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन व्हर्टू अॅस्टर पी नावाने चीनी बाजारात लाँच केला असून या फोनची बेसिक किंमत ३ लाख रु. आहे. दीड वर्षापूर्वी या कंपनीने यापुढे महाग फोन लाँच करणार नसल्याची घोषणा केली होती हे विशेष. मात्र नवा फोन लाँच करताना पुन्हा एकदा महाग फोन बाजारात आणला आहे. या मॉडेलच्या अन्य रंगातील फोनसाठी ५ हजार डॉलर्स म्हणजे साधारण ३ लाख ७९ हजार रु. मोजावे लागतील तर गोल्ड प्लेटेड मॉडेल साठी १४१४६ डॉलर्स म्हणजे १० लाख ४० हजार रु. मोजावे लागणार आहेत. कंपनी बनवीत असलेल्या स्मार्टफोनचे सुटे भाग हाताने बनविले जातात असेही समजते.

नव्या व्हर्टू अॅस्टर पी साठी ४.९ इंची एमोलेड डिस्प्ले दिला गेला असून १२ एमपीचा रिअर तर २० एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. अँड्राईड ओरिओ ८.१ ओएस, ६ जीबी रॅम, १२८ जीबी इंटर्नल मेमरी, क्विक चार्ज ३.० सपोर्ट करणारी ३२०० एमएएच बॅटरी, दिली गेली असून फोनचे प्रीबुकिंग जेडी डॉट कॉम वर करता येणार आहे. फोन ३० ऑक्टोबर पासून दिले जाणार आहेत.

यापूर्वी या कंपनीने सिग्नेचर कोब्रा नावाने एक स्मार्टफोन लाँच केला होता. त्यावर अस्सल माणके आणि हिरे जडविले गेले होते. त्या फोनची ८ युनिट बनविली गेली होती आणि प्रत्येक युनिट ची किंमत होती २ कोटी ३० लाख रुपये.

Leave a Comment