मी टू नंतर हॅशटॅग मॅन टू अभियान सुरु

mantoo
गेले काही दिवस महिलांवर होत असलेल्या लैगिक शोषणाला वाचा फोडणारे आंदोलन हॅश टॅग मी टू सुरु असून यात अनेक महिला खुलेपणाने आपल्याला सामोरे जावे लागलेल्या छळाला संबंधित पुरुषांच्या नावानिशी तोंड फोडत आहेत. या संदर्भात पुरुषांनीहि महिलांकडून ज्यांचे लैगिक शोषण झाले त्यांच्या दु:खाला वाचा फोडण्यासाठी हॅश टॅग मॅन टू अभियान सुरु केले आहे.

१५ पुरुषांच्या गटाने हे अभियान सुरु केले असून त्याची सुरवात शनिवारी एनजीओ चिल्ड्रनस राईट्स इनेशीएटिव्ह फोर शेअर्ड पेरेंटिंग (क्रिम्प) कडून केली गेली. या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष कुमार व्ही म्हटले आमचे अभियान मी टू विरोधात नाही. मात्र मी टूच्या माध्यमातून कुणालाही फसवायचे या प्रकाराला प्रोत्साहन मिळू नये आणि त्याचा दुरुपयोग करून कष्टाने समाजात नावलौकिक मिळविलेल्या व्यक्तीचा सन्मान धुळीत मिळविला जाऊ नये यासाठी आहे. या माध्यमातून आम्ही तटस्थ लैगिक कायदा असावा यासाठी प्रयत्नशील आहोत. एकाद्या महिलेले मीटू च्या माध्यमातून खोटे दावे केले तर त्यांना शिक्षेची तरतूद हवी.

सध्या अनेक वर्षांपूर्वी झालेल्या तथाकथित लैगिक शोषणाच्या चर्चा या माध्यमातून केल्या जात आहेत. अश्यावेळी या महिलांनी सोशल मिडिया पेक्षा न्यायालयात जाणे अधिक योग्य ठरेल असे आमचे म्हणणे आहे. आम्ही या अभियानांतून ज्या पुरुषांना आत्ताही महिलांच्या कडून होणार्या लैंगिक छळाला सामोरे जावे लागत आहे त्यांच्या व्यथांना वाचा फोडणार आहोत.

या उद्घाटनाला फ्रांसचे माजी राजकारणी पास्कल माजुरीअर उपस्थित होते. यांना १७ वर्षापूर्वी त्यांच्या मुलीनेच लैगिक छळ केल्याचा आरोप करून न्यायालयात खेचले होते. मात्र न्यायालयांने त्यांची नुकतीच निर्दोष म्हणून सुटका केली आहे. याचा संदर्भ देऊन कुमार म्हणाले समाजात निम्मा वर्ग पुरुष आहे. त्याच्या समस्यातून मार्ग काढणे हा आमचा उद्देश आहे कारण महिलांकडून होत असलेल्या लैगिक अत्याचाराविरोधात ते बोलत नाहीत.

Leave a Comment