अनोखा अनुभव देणारा चांदीपूर बीच

chandipur
जगातील सर्वाधिक सुंदर समुद्रकिनाऱ्यामध्ये ओरिसातील चांदीपूर बीचचा समावेश होतो. पर्यटनाच्या दृष्टीने हे ऑफबीट डेस्टिनेशन आहे. मात्र येथे एकदा तरी आवर्जून भेट द्यायला हवी. येथील समुद्र तुम्हाला वेगळाच अनुभव देणारा आहे. येथे एकाच दिवसात समुद्राचे पाणी एका क्षणात एकदम खाली तर मिनिटभरात पुन्हा पुरासारखे वाढलेले पाहता येते. भरती ओहोटी मुळे हा थरारक अनुभव घेता येतो. सर्वात महत्वाचे म्हणजे या बीचवर ऐन पावसाळ्यातही पर्यटनाचा आनंद लुटता येतो.

chandi
हा समुद्र पोहोता न येणाऱ्या लोकांसाठीही अतिशय सुरक्षित आहे. बाकी समुद्र काहीवेळा भयंकर वाटतात हा समुद्र मात्र तुमच्याशी जवळीक साधतो. समुद्राचे पाणी गुडघ्याचा वर जातच नाही त्यामुळे समुद्रात आतवर चालत जाण्याची मजा येथे घेता येते.

चांदीपूरचे आणखी एक वैशिष्ट आहे ते येथील मिसाईल प्रक्षेपण केंद्र. १९८९ पासून येथे अनेक स्वदेशी मिसाईलच्या चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात आकाश, शौर्य, पृथ्वी, अग्नी या मिसाईलचा समावेश आहे. चांदीपूर गाव आणि बीचवर निवास भोजनाची सोय उत्तम असून मासेप्रेमींसाठी अथवा सीफूड ची आवड असणार्यांची जिव्हा तृप्ती करणारे अनेक पदार्थ येथे मिळतात.

Leave a Comment