इस्तांबुल दुतावासातच केली पत्रकार खशोग्गींची हत्या, सौदी अरेबियाची कबुली

Jamal-Khashoggi
रियाध – इस्तांबुल दुतावासातच पत्रकार जमाल खशोग्गी यांना ठार करण्यात आले असल्याचे तपासातून समोर आले आहे, असे सौदी अरेबियाने सांगितले आहे. खशोग्गींच्या मृत्यूमध्ये संशयित म्हणून १८ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सौदीतील ‘अल-अरेबिया’ वृत्तसंस्थेने दिली आहे. गोळीबार करुन खशोग्गींना सौदीच्या मुख्य तपास अधिकाऱ्यांनी ठार केले असल्याचे समोर आले आहे.

सौदी अरेबियाला खशोग्गी यांच्या अपहरणावरुन नेहमी धमकी देणारी अमेरिका आता काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे. अमेरिकेला पत्रकार खशोग्गी यांच्या मृत्यूच्या बातमीने दु:ख झाल्याची माहिती अमेरिकन वृत्तसंस्थांनी दिली आहे. अमेरिकेचे नागरिकत्व असलेले पत्रकार जमाल खशोग्गी हे वॉशिंग्टन पोस्टसाठी लिखाण करत होते. ते २ ऑक्टोबरपासून गायब झाले होते. इस्तांबुलमधील सौदी दुतावासात प्रवेश करताना ते कॅमेऱ्यात दिसून आले. त्यानंतर खशोग्गींबद्दल कुठलीच माहिती नव्हती.