जगातील सर्वात सुंदर गुहा खरेदी करण्याची संधी

guha
गुहा म्हटले कि दाट जंगले, त्यातील प्रचंड मोठ्या शिळा आणि शिलांमध्ये असलेल्या गुहेत राहणारे वन्य प्राणी आपल्या नजरेसमोर येतात. मात्र जगात अशाही अनके गुहा आहेत ज्यात माणसेही राहतात. अशीच एक जगातील सर्वात सुंदर गुहा अमेरिकेच्या अर्कान्सास भागात आहे. दुर्गम जागी असलेल्या या गुहेचे नाव बेकहम क्रीक लोज असे आहे. फार पूर्वी बॉम्बवर्षाव होत असेल तर या गुहेचा वापर शेल्टर होम म्हणून केला जात असे.

guha1
नंतर मात्र या गुहेचा संपूर्ण कायापालट केला गेला आणि १९८८ मध्ये या गुहेचे रुपांतर एका भव्य, अलिशान हॉटेल मध्ये करण्यात आले. त्यासाठी तेव्हा २० लाख रुपये खर्च केले गेले. जगातली सगळी सुखे आणि ऐशोआराम येथे उपलब्ध आहेत. हि गुहा अतिशय सुंदर आहेच पण नूतनीकरण करताना तिचा मुळचा साधेपणा राखला गेला आहे. येथे एक धबधबा आहे आणि हेलीपॅडही.

या हॉटेल मध्ये राहण्यासाठी एका रात्रीचा खर्च १ लाख १२ हजार असून हि गुहा आता विक्री केली जाणार आहे. या गुहेला १९ ते २० कोटी किंमत मिळेल असा अंदाज असून या गुहेत चार बेडरूम आहेत. येथे जंगलात राहिल्याचा फील हमखास मिळतो असेही सांगितले जाते.

Leave a Comment