मेगन मॅरी, जगातील सर्वात महागडी पत्रकार

merry
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात सतत बातम्या देणारी निर्भीड पत्रकार मेगन मॅरी हि जगातली सर्वाधिक महागडी पत्रकार म्हणून ओळखली जाते. ती सध्या एनबीसी या चॅनल वर नोकरी करत आहे. एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी मेगनवर अश्लील कॉमेंट केली आणि तेव्हापासून ती ट्रम्प यांच्या विरोधात खडी आहे. ट्रम्प यांच्य्कडून शारीरिक शोषण झाल्याचा आरोप करणाऱ्या महिलांचे अनेक कार्यक्रम तिने टीवीवर सादर केले आहेत.

मेगन जगातली महागडी पत्रकार मानली जाते. गेल्या वर्षी तिला १३३ कोटी रुपये पगारापोटी मिळाले होते तर यंदा त्यात १५ कोटींची वाढ होऊन हा आकडा १४८ कोटींवर गेला आहे. गेली १३ वर्षे ती इलेक्ट्रोनिक मीडियात काम करते आहे. तिने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची मुलाखत घेतली होती तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रांस भेटीवर होते तेव्हा त्यांचीही मुलाखत घेतली आहे. मेगनचा फॅशन सेन्स अतिशय उत्तम असून तिच्या नेलपॉलिश पासून तिच्या हाय हिल्स पर्यंत सर्व गोष्टींची चर्चा मीडियात सतत होत असते.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपासून मेगन अधिक चर्चेत आली. तिच्या पतीने ट्रम्प यांच्यावर मेगनचे चरित्र हनन केल्याचा आरोप केला होता. मेगनचा पहिला घटस्फोट झाला असून तिने दुसरा विवाह आयटी सुरक्षा कंपनीचे संस्थापक डग्लस बर्न्त याच्याबरोबर केला आहे. तिला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. तिने काही काळ एरोबिक्स प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे.

Leave a Comment