गौतम अडाणी ग्रुप देशभर सुरु करणार पेट्रोल पंप

adani
देशातील बडे उद्योजक गौतम अडाणी ग्रुपने फ्रांसच्या टोटल या इंधन कंपनीबरोबर नुकताच एक करार केला असून त्यानुसार येत्या १० वर्षात देशात १५०० एलएनजी पेट्रोल पंप सुरु केले जाणार आहेत. टोटल हि फ्रांसची नामांकित उर्जा कंपनी आहे.

या दोन्ही कंपन्यांनी मिळून ओरिसा येथील धमार येथे एलएनजी टर्मिनल निर्माण करण्यासाठी करार केला आहे. त्यातून येत्या १० वर्षात १५०० पेट्रोल पंपाचे जाळे देशात उभारले जाणार आहे. टोटल हि जगातील दोन नंबरची मोठी एनएलजी कंपनी आहे. देशातील मुख्य रस्ते आणि महामार्गावर हे पंप असतील आणि आंतरराष्ट्रीय मानकानुसार तेथे सर्विस स्टेशन, इंधन विक्री, ल्युब्रीकंट विक्री आणि अन्य उत्पादने आणि सेवा पुरविल्या जाणार आहेत असे समजते.

Leave a Comment