व्हॉट्सअॅप आणणार सुट्टीवर जाणाऱ्यांसाठी नवीन फिचर

whatsapp
जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप म्हणून ओळखले जाणारे व्हॉटसअॅप लवकरच एक नवीन फिचर लॉन्च करणार असून या नवीन फिचरमुळे व्हॉटसअॅप सुट्टीवर असताना वापरणे अधिक सोयीस्कर होणार आहे. आपल्या बीटा व्हर्जनवर ‘व्हेकेशन मोड’ या नवीन फिचरची चाचणी कंपनी करत असल्याची माहिती व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनसंदर्भात बातम्या देण्याऱ्या ‘डब्यूएबीटाइन्फो’ या वेबसाईटने सांगितले आहे.

अनेक नवनवीन फिचर्स वर्षभरामध्ये लॉन्च करणारे व्हॉट्सअॅप या ‘व्हेकेशन मोड’ फिचरवर मागील काही महिन्यांपासून काम करत आहे. सध्या अॅपवरील ‘सायलेन्ट मोड’च्याच पुढची पायरी म्हणजे ‘व्हेकेशन मोड’ असल्याचे वेबसाईटचे म्हणणे आहे. व्हॉट्सअॅप सध्या सायलेन्ट मोडवर वापरताना किती मेसेज आले यासंर्भातील नोटीफिकेशन्सचे आकडे व्हॉट्सअॅपच्या आयकॉनवर दिसत नाहीत.


पण व्हॉट्सअॅप नवीन ‘व्हेकेशन मोड’मध्ये म्यूटवर टाकल्यास येणारे नवीन मेसेजेस अर्काइव्हसमध्ये सेव्ह केले जातील, पण त्यावेळी आधीच अर्काइव्हमध्ये सेव्ह असणारे मेसेजही तेथेच राहतील. सध्या नवीन मेसेजेस आल्यानंतर जुने मेसेजस आपोआपच अनअर्काइव्ह केले जातात. म्हणजे आता व्हॉट्स अॅप ‘व्हेकेशन मोड’वर असताना नवीन मेसेज आल्यानंतर संग्रहित मेसेजस आपोआप काढले जाणार नाहीत. हा पर्याय ऐच्छिक असेल.

Leave a Comment