आजपासून भारतात अॅपलच्या ‘या’ सर्वात स्वस्त आयफोनची विक्री

Iphone
नवी दिल्ली – भारतात शुक्रवारपासून म्हणजेच आजपासून अॅपलच्या सर्वात स्वस्त आयफोन एक्सआरची विक्री सुरु होणार आहे. ७६ हजार ९०० रुपये एवढी याची किंमत आहे. गुरुवारी (१८ ऑक्टोबर) माहिती देताना कंपनीने सांगितले, की २६ ऑक्टोबरपासून अॅपलच्या अधिकृत स्टोअर्सवर आयफोन एक्सआर उपलब्ध होणार आहे.

बाजारात ६४ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबी, असे तीन मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. हे मॉडेल्स ब्लॅक, व्हाईट, ब्ल्यू, येल्लो, रेड आणि कोरल या रंगामध्ये बाजारात येणार आहेत. या फोनची बॉडी ग्लास आणि अॅल्युमिनियमची बनली असून डिस्प्ले ६.१ इंचीचा आहे.

यासह लग्झरी आयफोन एक्सएस आणि एक्सएस मॅक्स पण लाँच झाला आहे. याबाबत अॅपलचे म्हणणे आहे, की पूर्ण दिवस या फोनची बॅटरी चालणार असल्यामुळे भरपूर बॅटरी बॅकअप ग्राहकांना मिळणार आहे. आयफोन एक्सआरमध्ये १२ एमपीचा रिअर कॅमेरा आणि ७ एमपीचा फ्रंट कॅमेरा असून सेंसर्सही लागले आहेत. हा फोन वॉटरप्रूफ असून कॉफी, चहा किंवा सोडा हे पेय यावर पडल्यासही फोन खराब होणार नाही, असे कंपनीचे म्हणणे आहे.

Leave a Comment