श्रीलंकेतील रावण गुहा बनतेय पर्यटकांचे आवडते स्थळ

caveravan
भारताच्या दक्षिणेला असेलली श्रीलंका हीच रावणाची लंका असल्याचे अनेक पुरावे नवीन संशोधनातून हाती येऊ लागले आहेत. श्रीलंकेच्या एल्ला भागात प्रचंड पहाडावर रावणाच्या गुप्त गुहेचा शोध लागला असून हि जागा रावणाने सीतेला ज्या अशोकवाटिकेत ठेवले होते तेथून फक्त दोन किमी अंतरावर आहे.

falls
समुद्रसपाटीपासून ४४९० फुट उंचीवर असलेल्या या गुहेत जाण्याचा मार्ग अतिशय खडतर असला तरी हा सारा भाग खूपच निसर्गरम्य आहे. या गुहेत जाण्यासाठी अतिशय अरुंद रस्ता आहे आणि बऱ्याच पायऱ्या चढून जावे लागते. रस्त्यात एक अतिशय देखणा म्हणावा असा धबधबा आहे. आजूबाजूला दाट जंगल आहे आणि अनेक वन्य प्राणी आहेत. श्रीलंकेला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये या गुहेचे आकर्षण वाढते असून हे लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. या ठिकाणी वर्षभर जाता येत असले तरी पावसाळ्यात शक्यतो जाऊ नये.

Leave a Comment