कुल्लूचा जगप्रसिद्ध दशहरा

kullu
कुल्लू या हिमाचल प्रदेशातील गावी होणारा दशहरा हा ऐतिहासिक दृष्टीने खूपच महत्वाचा आणि रितीरिवाजाचे पालन करून साजरा केला जाणारा उत्सव आहे. सहा दिवस हा सोहळा सुरु असतो आणि येथे शेवटच्या दिवशी रावण दहन केले जात नाही तर लंका दहन केले जाते. येथे या उत्सवाला दशमी असे म्हटले जाते. दुर्गा उत्सव समाप्ती नंतर हि दशमी खऱ्या अर्थाने रंगते.

kullu1
येथे रावण, मेघनाद आणि कुंभकर्ण याच्याऐवजी क्रोध, मोह आणि काम या विकारांचा नाश करण्याचे प्रतिक म्हणून पाच प्राणी बळी दिले जातात. उत्सवाच्या अगोदर १५ दिवस राजा घाटीतील सर्व देवी देवताना धौलपूर घाटी मध्ये रघुनाथ म्हणजे रामाच्या सन्मानार्थ यज्ञ केला जाणार असल्याचे व त्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देतो. १०० पेक्षा अधिक देवी देवतांच्या सजविलेल्या पालख्या येथे वाजत गाजत येतात. त्यात मनालीची हिडींबा देवीची पालखीही असते. यावेळी भव्य रथयात्रा निघते.

dahan
राम सीता, हिडींबा यांची हि यात्रा सहा दिवस विविध भागातून फिरते. सर्व देवी देवतांच्या भेटी घडविल्या जातात. ७ व्या दिवशी बियास नदी काठी लंका दहन केले जाते. या नंतर पुन्हा रामाचा रथ पहिल्या जागी नेला जातो. हा उत्सव पाहण्यासाठी आसपासच्या परिसरातून भाविक येतातच पण देशी परदेशी पर्यटक मोठ्या संखेने हजेरी लावतात.

Leave a Comment