२५ महिन्यात जिओची ग्राहकसंख्या २५ कोटीहून अधिक

usears
रिलायंस उद्योग लिमिटेडच्या जिओने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ६८१ रुपये शुद्ध नफा मिलावितानाच २५ महिन्यात २५ कोटीहून अधिक ग्राहक जोडले आहेत. पैकी या तिमाहीत ३ कोटी ७० लाख नवे ग्राहक आहेत. जिओ लाँच झाल्याच्य पाहिल्या दिवसापासून जिओच्या ग्राहक संख्येत सतत वाढ दिसून आली असून ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत जिओ ग्राहक संख्येने २५ कोटी २३ लाखचा टप्पा गाठला होता.

गेल्या एक वर्षात जिओने ११ कोटी ४० लाख ग्राहक जोडले असून हि संख्या टेलिकॉम इंडस्ट्री मध्ये सर्वाधिक आहे. या विषयी बोलताना रिलायंसचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले, सर्वोच्च गुणवत्ता, सर्वात किफायतशीर अशी हि आमची सेवा सर्वांना, सर्वांशी व सर्वत्र जोडण्याच्या उद्देशाने सुरु झाली होती आणि आमचा हा उद्देश यशस्वी झाला आहे. जिओ युझर कडून डेटा वापर दिवसेनदिवस वाढत आहे. दुसऱ्या तिमाहीत युजर्सनी ७७१ कोटी जीबी डेटा वापरला असून याची मासिक सरासरी प्रती युजर ११ जीबी आहे. या तिमाहीत युजर्सनी दरमहा सरासरी १७.५ तास व्हिडीओ वापरला असून अन्य प्रतिस्पर्धीच्या तुलनेत हा वापर सर्वाधिक आहे.

Leave a Comment