चीनच्या चंग्दू शहरात २०२० पासून कृत्रिम चंद्राचा प्रकाश पडणार आहे. असा चंद्र लाँच करण्यासाठीच्या प्राथमिक चाचण्या घेण्यात आल्या असल्याचे समजते. या चंद्राचा प्रकाश ५० मैल परिसरात पडू शकणार आहे आणि त्यामुळे रात्री पथदिवे लावण्याची गरज संपेल असे सांगितले जात आहे. हि योजना यशस्वी झाली कि अन्य शहरातूनही असाच कृत्रिम प्रकाश पुरविला जाणार आहे.
चीनमध्ये कृत्रिम चंद्र देणार शहरात रात्रीचा प्रकाश
चंग्दू एअरोस्पेस आणि टेक्नोलॉजी मायक्रोइलेक्ट्रोनिक सिस्टीम रिसर्च संस्थेचे अध्यक्ष वू शून्फेंग यांनी १० ऑक्टोबरला या संदर्भातील घोषणा केली. ते म्हणाले या साठी अंतराळात एक उपग्रह स्थापन करण्यात येणार असून तो सूर्याचा प्रकाश परावर्तीत करून रात्रीत शहरात प्रकाश देईल. विजेपेक्षा हा खर्च कमी आहे आणि यामुळे ६ ते ५० मैलाचा परिसर उजळून टाकता येणार आहे.
काही जाणकारांनी मात्र याला विरोध केला असून शहरात त्यामुळे रात्र नाही अशी परिस्थिती येईल आणि त्याचा माणसावरच नाही तर प्राण्यांवर विपरीत परिणाम होऊ शकेल अशी भीती व्यक्त केली आहे.