दर ३५ दिवसांनी या डोंगरावर भरतो ‘सेक्स फेस्टिव्हल’

sex
दर ३५ दिवसांनी इंडोनेशियाच्या जावामध्ये एक असा उत्सव साजरा केला जातो, ज्यात अनोळखी व्यक्तींशी हजारोंच्या संख्येने अनुयायी शरीरसंबंध ठेवतात. हा फेस्टिव्हल ज्या डोंगरावर भरतो त्याचे नाव ‘माउंट गुनुंग केमुकस’ असे आहे. इंडोनेशियात या डोंगराला ‘सेक्स हिल’ म्हणजेच ‘प्रणयाचा डोंगर’ असे नाव आहे. हा फेस्टिव्हल येथे साजरा करण्याचेही कारण विचित्र आहे.
sex2
वास्तविक, इंडोनेशियात साजरा केल्या जाणाऱ्या या ‘सेक्स फेस्ट’मागे अशी मान्यता आहे की, अशा प्रकारे शरीरसंबंध ठेवल्याने त्यांचे नशीब उजळू शकते. एका राजकुमाराला येथे आपल्या सावत्र आईशी संबंध बनवताना पकडण्यात आले होते. एकमेकांवर दोघांचे जीवापाड प्रेम होते. परंतु पकडण्यात आल्यानंतर दोघांचीही हत्या करण्यात आली. त्या दोघांचेही मृतदेह याच डोंगरावर दफन करण्यात आले.
sex3
या प्रथेचे अध्ययन करणारे समाजशास्त्रज्ञ म्हणतात की, एक तीर्थयात्री म्हणून येथे लोक येतात. त्यांचे मानणे असते की, आपल्या कामुकतेचे प्रदर्शन केल्याने त्यांचे भाग्य उजळेल. हे जाणून प्रत्येकाला आश्चर्य वाटते, परंतु येथे येणाऱ्या लोकांची मात्र अशीच मानसिकता असते. दर ३५ दिवसांच्या अंतरानंतर गुनुंग केमुकस नावाच्या या डोंगरावर एक अनुष्ठान होते. देशभरातील लोक ज्यात सहभागी होतात. तथापि, इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा मुस्लिम लोकसंख्येचा देश आहे. पुरातन जावनीज कॅलेंडरनुसार येथे ३५ दिवस निवडले जातात, जेव्हा रहस्यमय ठिकाणावर अंधार पसरू लागतो. तेव्हा पवित्र देवदारू वृक्षाखाली मेणबत्तीच्या उजेडात लोक चटई अंथरूण बसतात.
sex1
विशालकाय अंजीर वृक्षाची मुळे लटकू लागतात, अशा वेळी येथे अनोळखी व्यक्तीशी संबंध बनवले जातात. असे म्हणतात की, राजकुमार पैंगेरन समोद्रो हा राणी नायी ओंत्रोवुलान हिच्यासोबत पळून गेला होता. ओंत्रोवुलान ही त्याच्या वडिलांची पत्नी आणि त्याची सावत्र आई होती. हे दोघेही या गुनुंग केमुकस डोंगरामध्ये लपून बसले होते. या डोंगराच्या दोन पवित्र तलावांपैकी एकामध्ये स्नान करणे यात्रेकरूंसाठी आवश्यक आहे. या स्नानानंतर ते एखाद्या अनोळखीशी संबंध ठेवू शकतात.

जावा बेटाच्या राज्यपालांनी २०१४मध्ये या उत्सवावर बंदी आणण्याची घोषणा केली होती. त्यांचे म्हणणे होते की, या प्रथेचा धर्माशी काहीही संबंध नाही. अवघ्या जगाचे लक्ष या प्रथेकडे जात असून ती आपल्या देशासाठी शरमेची बाब आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर या प्रथेवर बंदी घालण्यात आली. परंतु त्यांच्या बंदीचा म्हणावा तितका परिणाम झाला नाही. वास्तविक, या प्रथेच्या नावाखाली या डोंगरावर वैश्यांची भलीमोठी वस्ती तयार झाली आहे. ज्यामुळे अवैध धंदेही बोकाळले आहेत. उत्सवाचे महत्त्व जाऊन याला बीभत्स रूप आले आहे. तथापि, आजही मोठ्या प्रमाणात हा उत्सव सुरू आहे.

Leave a Comment