अंबानी जिओनंतर आता करणार आणखी एक धमाका

mukesh-ambani
नवी दिल्ली – रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडचे (RIL) चेअरमन मुकेश अंबानी देशभरातील टेलिकॉम मार्केट हादरवून सोडणाऱ्या जिओच्या तूफाननंतर आता आणखी एक जबरदस्त प्लॅन घेऊन येण्याच्या तयारीत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, लवकरच देशात दोन प्रमुख केबल टीव्ही आणि ब्रॉडबॅन्ड सेवा कंपन्या हॅथवे केबल अॅड डेटाकॉम आणि डेन नेटवर्क्समध्ये मुकेश अंबानी मोठी भागिदारी विकत घेऊ शकतात. दोन्ही कंपन्यांमध्ये अंबानींनी २५ टक्के भागिदारी घेण्याचा निर्णय घेतला असे सांगितले जात आहे.

तत्पूर्वी रिलायंस इंडस्ट्रीजच्या जुलै महिन्यातील ४१ व्या वार्षिक महामेळाव्यात (AGM) मुकेश अंबानी यांनी जिओ गिगा फायबर ब्रॉडबॅन्ड सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. एजीएममध्ये त्यांनी जिओ गिगा राउटर आणि जिओ गिगा टीव्ही सेट लॉन्च केले होते. मुकेश अंबानी म्हणाले होते, की सुरुवातीला देशातील ११०० शहरांमध्ये जियो ब्रॉडबॅन्ड सेवा सुरू केली जाणार आहे. लवकरच यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होईल. ज्या शहरात सर्वाधिक नोंदणी होईल त्या शहरात त्या शहरात सर्वात प्रथम ही सेवा दिली जाईल.

देशात सर्वात स्वस्त दरांमध्ये जिओ ब्रॉडबॅन्डच्या माध्यमातून ब्रॉडबॅन्डची सुविधा दिली जाणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने फायबर कनेक्टिव्हिटीसाठी २.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. लवकरच फिक्स्‍ड लाइन ब्रॉडबॅन्ड देणाऱ्या टॉप-५ मध्ये समाविष्ट होणे हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे लक्ष्य आहे.

लवकरच या डीलची घोषणा होण्याची शक्यता आहे. हॅथवे आणि डेनने स्टॉक एक्सचेंज संदर्भात सांगितले, की १७ ऑक्टोबरला त्यांच्या बोर्डची मीटिंग होणार आहे. यामध्ये फंड गोळा करण्याच्या प्रस्तावाचा विचार केला जाईल. दोन्ही कंपन्यांच्या बोर्डच्या बैठकांविशयी स्टॉक एक्सचेंजला सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment