५ जी सपोर्ट सह येणार शाओमीचा मी मॅकस ३

mimax
चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी शाओमी त्यांचा नवा मी मॅकस ३ स्मार्टफोन येत्या २५ ऑक्टोबरला पेचिंग येथे लाँच करत असून हा फोन ५ जी ला सपोर्ट करणारा आहे असे संकेत कंपनीने दिले आहेत. कंपनीचे जागतिक प्रवक्ते डोनावन सुंग यांनी या फोनची दोन पोस्टर जारी केली आहेत.

प्रसिद्ध झालेल्या फोटोवरून हा फोन ५ जी सपोर्ट करेल आणि त्याच्या पुढच्या बाजूला ऑल डिस्प्ले डिझाईन असेल असे दिसते आहे. या फोनला ओप्पो फाईंड एकस प्रमाणे स्लायडर कॅमेरा दिसत असून फ्रंट कॅमेराही स्लायडर मेकॅनिझमचाच असावा असा अंदाज केला जात आहे. या फोन ला ८ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज असेल आणि हा अँड्राईड ओरिओ ८.१ ओ एस सह येईल. हा फोन साधारण ४७५०० रुपयांपर्यंत मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment