बंगलोर मध्ये सुरु झाले देशातील पहिले क्रीप्टोकरन्सी एटीएम

unocoin
कर्नाटक मधील बंगलोर येथील कॅम्प मॉल मध्ये देशातील पहिले क्रीप्टोकरन्सी एटीएम सुरु झाले असून ते शहरात कुतूहलाचा विषय बनले आहे. युनोकॉईन या व्हर्चुअल करन्सी एक्स्चेंज कंपनीने हे एटीएम सुरु केले असून रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याची नियमाचे यात उल्लंघन झालेले नाही असा दावा केला आहे. १४ ऑक्टोबर पासून हे एटीएम सुरु झाले आहे आणि त्यात पैसे भाराने, काढणे आणि त्या पैशांचा वापर करून युनोकॉईन वेबसाईट व अॅपवरून क्रीप्टोकरन्सीची खरेदी करण्यासाठी करता येणार आहे. मुंबई आणि दिल्ली येथेही अशी एटीएम लवकरच बसविली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

क्रीप्टोकरन्सी व्यवहार भारतात कायदेशीर मानले जात नाहीतच पण जुलै मध्ये सर्व बँकांना क्रीप्टोकरन्सी देवघेवीसाठी रिझर्व बँकेने बंदी घातली आहे. यामुळे युनीकॉईनला अनेक कायदेशीर लढाया लढाव्या लागल्या आहेत. त्यांच्या मते या एटीएमचा बँकिंग सिस्टीमशी संबंधच नसल्याने त्यात रिझर्व बँक नियम उल्लंघन होण्याचा प्रश्न नाही. सध्या जगातील ७६ देशात ३८७९ क्रीप्टोकरन्सी एटीएम कार्यरत आहेत. आमच्या ग्राहकांना क्रीप्टोकरन्सी खरेदी, विक्री, पैसे काढणे यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन आम्ही हि सुविधा त्यांना दिली आहे.

हे एटीएम बँकेच्या एटीएम प्रमाणेच काम करेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. यात ग्राहक एका वेळी १ हजार ते १० हजार रु. पर्यंत डीपॉझीट करू शकणार आहेत.

Leave a Comment