नालंदा येथील आशापुरी मंदिरात नवरात्रात महिलांना असते प्रवेश बंदी

nalanda
देशात सध्या सर्वत्र नवरात्र उत्सव साजरे केले जात असून देवीच्या सर्व मंदिरांसमोर भाविकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. या महिला भाविकांची गर्दी लक्षणीय असते. मात्र बिहारच्या नालंदा येथील आशापुरी माता मंदिरात मात्र नवरात्रात महिलांना मंदिर प्रवेशासाठी बंदी असते. हे देवीचे सिद्धपीठ खूप प्राचीन आहे. ९ व्या शतकात जेव्हा वज्र तंत्र व सहज ज्ञान यांचा वेगाने प्रसार झाला त्यावेळी हे जगातील सर्वात प्रचलित बौध्द साधना केंद्र बनले होते.

महिलांना नवरात्रात प्रवेश बंदी मागे असे कारण दिले जाते कि, या काळात येथे लोक तंत्र मंत्र साधनेसाठी येतात आणि देवीची पूजाही तंत्र मंत्र क्रियेने केली जाते. यासाठी दूरदुरून तांत्रिक जमतात. शेवटच्या दिवशी निशा पूजन होते आणि विशेष हवन केले जाते. त्यावेळी वाईट शक्ती जवळ येतात आणि त्याची बाधा महिलांना लवकर होते. अशी बाधा झाल्यास पूजा सार्थकी लागत नाही. त्यामुळे महिलांना प्रवेश दिला जात नाही. मात्र या पूजेनंतर महिला दर्शन घेऊ शकतात. या काळात महिलाना दर्शन घेता यावे यासाठी मंदिराच्या आवारात वेगळे मंदिर उभारले गेले आहे.

हे मंदिर पाल कालीन असून मत सिद्धीदात्री स्वरुपात आहे. देवीच्या दोन मूर्ती अडून शिव पार्वती, बुद्ध यांच्या अनेक मूर्ती आहेत. या सर्व मूर्ती काळ्या रंगाच्या आहेत. हि देवी इच्छापूर्ती करणारी आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे.

Leave a Comment