जगातला सर्वात छोटा अँड्राईड स्मार्टफोन लाँच

palm
अमेरिकन इलेक्ट्रोनिक कंपनी पाम ने जगातील सर्वात छोटा छोटा अँड्राईड स्मार्टफोन लाँच केला असून या हँडसेटला आयपी ६८ रेटिंग दिले गेले आहे. या फोन बँकेच्या क्रेडीट कार्डप्रमाणे आहे. या पूर्वी या कंपनीने २०११ साली त्यांचा पहिला स्मार्टफोन प्री ३ लाँच केला होता. ज्या युजरना मोठ्या डिस्प्लेचे स्मार्टफोन वापरण्यापासून सुटका हवी आहे त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन अतिशय उपयोगी आहे असा कंपनीचा दावा आहे.

या फोनला ३.३ इंची एचडी एलसीडी डिस्प्ले दिला गेला असून फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूना कोर्निंग गुरील्ला ग्लास दिली गेली आहे. फोनला ३ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज, अँड्राईड ओरिओ ८.१ ओएस, १२ एमपीचा फ्लॅश सह रिअर कॅमेरा, ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनसाठी बॅटरी ८०० एएमएचची असली तरी ती दिवसभर चालेल असा कंपनीचा दावा आहे. या फोन साठी फेस अनलॉक फिचर दिले गेले आहे. फोन आकाराने छोटा असला तर किमतीत मात्र अन्य स्मार्टफोनच्या तुलनेत मोठा आहे. या फोनची किंमत आहे ३५० डॉलर्स म्हणजे २५८०० रुपये.

Leave a Comment