बुधवार सकाळपासून युट्युब ठप्प, युजर्स हैराण

youtube
व्हिडीओ शेअरिंग वेबसाईट युट्यूब बुधवार सकाळपासून जगभरात ठप्प झाल्याने जगभरातील युजर्स त्रासले आहेत. बुधवारी सकाळपासून होमपेजवर एरर संदेश येत आहे आणि तरीही युजर्सनि सर्च करायचा प्रयत्न केला तर व्हिडीओ चा स्क्रीन काळा दिसतो आहे.

या संदर्भात युट्युबने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वर युट्युब, युट्युब टीव्ही, युट्युब म्युझिक यावर येत असलेल्या अडचणी कळविल्याबद्दल युजर्सना धन्यवाद देताना साईट मधील दोष दूर करण्याचा प्रयत्न सुरु झाला असून लवकरच हा दोष दूर होईल आणि साईट पूर्वपदावर येईल असे कळविले आहे.

युट्युब अचानक जगभरात ठप्प होण्यामागचे कारण समजलेले नाही मात्र जाणकार तज्ञांच्या मते सर्वर मध्ये बिघाड झाला असावा असे समजते.

Leave a Comment