१०० वर्षे जुन्या झाडाला लिलावात १०.५८ लाखांची बोली

shisham
केरळ मध्ये नुकत्याच झालेल्या सरकारी लिलावात एका १०० वर्षे जुन्या शिसवीच्या झाडाला तब्बल १०.५८ लाख रुपयांची बोली मिळाली असून एखाद्या झाडासाठी लागलेली ही सर्वाधिक बोली असल्याचे समजते.

या क्लासवन झाडाची लांबी ३१० फुट तर रुंदी २४६ फुट होती. कोची येथील जेम वूड या कंपनीने हे झाड लिलावात घेतले असून हा ई लिलाव होता. हि कंपनी संगीत वाद्यांसाठी लाकूड निर्यात करणारी कंपनी आहे. हे झाड दुसऱ्या महायुद्धात सेवा बजावणाऱ्या सैनिकांसाठी दिलेल्या जमिनीवर होते. मार्च मध्ये ते कापले गेले. या झाडाच्या लकडापासून अकुस्टीक गिटारचे सुटे भाग बनविले जाणार असल्याचे समजते.

आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय शिसवी लाकडाला फार मागणी असून हे लाकूड महाग आहे असे समजते.

Leave a Comment