या गावात प्रत्येक व्यक्ती कुंग फु मास्टर

kungfu
स्वसंरक्षण प्रत्येकाला अवगत असले पहिजे याविषयी कुणाचे दुमत होणार नाही. कोणत्याची संकट काळात स्वसंरक्षण उपयुक्त ठरते. कुंग फु प्राचीन कला तर स्वतः बरोबर दुसऱ्याचे रक्षण करण्यासाठीही उपयुक्त कला मानली जाते. मध्य चीनच्या तियानझु प्रांतातील गॅक्सीडॉंग या गावाची प्रसिद्धी मार्शल आर्ट साठी जगभरात आहे.

या गावाने कुंग फुची असामान्य परंपरा अतिशय निष्ठेने जपली असून या गावातील कामगार असोत, शेतकरी असोत अथवा व्यावसायिक, उद्योजक असोत सर्व लोक येथे नियमाने कुंग फुचा सराव करताना दिसतात. असे सांगतात कि १५० वर्षापूर्वी येथे तन्ग्लाओशून नावाचा एक भिक्षु आला होता. त्याने राजाच्या सेनेपासून बचाव होण्यासाठी येथील शाओलीन मंदिरात आश्रय घेतला होता.

kungfu1
सुरवातीला गावातील लोकांनी त्याला त्रास दिला मात्र त्याला अवगत असलेल्या मार्शल आर्ट कलेने त्याने सर्वांचा पराभव केलाच पण त्याचा इतका प्रभाव गावातील लोकांवर पडला किं त्यांनीही कुंग फु आत्मसात करायला सुरवात केली आणि त्यात या भिक्षूने मोठे योगदान दिले.

तेव्हापासून येथील लोक नियमाने कुंग फुचा सराव करतात. गावाची लोकसंख्या ८ हजार आहे आणि सर्व नागरिक रस्त्यात, शेतात, घरात कुंग फु सराव करताना दिसतातच.

Leave a Comment