क्रिकेटचा रोमांच वाढविण्यासाठी येतेय स्मार्टबॅट

smartbat
क्रिकेट अधिक रोमांचकारी व्हावे यासाठी वेळोवेळी त्याच्या नियमात बदल केले जातात. दिवस रात्रीचे सामने, पांढरा बॉल, टी २०, पॉवर गेम हे सारे त्याचेच प्रकार आहेत.आता यात नवी भर पडत असून टीम इंडियाचा माजी कप्तान, गोलंदाज आणि कोच अनिल कुंबळे याचे त्यात मोठे योगदान आहे. इंजिनिअर असलेल्या अनिल कुंबळेने त्याच्या स्पेक्टकम कंपनीच्या माध्यमातून आणि मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने स्मार्ट बॅट तयार केली आहे.

या स्मार्टबॅटला पॉवर बॅट असे म्हटले जात असून स्पीक्स असे नाव दिले गेले आहे. अनिल कुंबळेच्या नव्या टेक कंपनीचे हे पहिलेच प्रोडक्ट आहे. ही स्मार्टबॅट आर्टीफीशीयल इंटेलिजन्स युक्त असून लाइव सामना टीव्हीवर बघणाऱ्या प्रेक्षकांना बॅटीने मारलेल्या शॉट बद्दल इथ्यंभूत माहिती मिळणार आहे. म्हणजे बॅट वर बॉल आदळला तेव्हाचा त्याचा वेग ते शॉटची क्वालिटी कशी होती इथपर्यंत सर्व समजू शकणार आहे. या स्मार्टबॅटमुळे क्रिकेटमधील रस अधिक वाढेल असे सांगितले जात आहे. अर्थात या बॅट मुळे खेळत बाधा येणार नाही. बॅटच्या वरच्या भागात एक हलके स्टीकर लावले असून ते सेन्सरचे काम करणार आहे.

Leave a Comment