इंडिया गेटपेक्षा उंच रावणाचे येथे होणार दहन

ravan
देशात सध्या रामलीलाची धूम सुरु असतानाचा आता लोकांना वेध लागले आहेत ते रावण दहनाचे. दुष्टावर सुष्टाच्या विजयाचे प्रतिक म्हणून दसरा किंवा विजयादशमी साजरी केली जाते. रामाचा रावणावर आणि दुर्गेच्या महिशासुरावरचा विजय म्हणजे विजयादशमी. यंदा हरियानातील पंचकुला येथील शालीमार मैदानात देशातील सर्वात मोठा रावणाचा पुतळा बनविला गेला असून तो दिल्लीतील इंडिया गेट पेक्षा दीड पटीने उंच आहे. या पुतळ्याची उंची २१० फुट असून हा पुतळा हायटेक आहे.

हा पुतळा उभा करण्यासाठी दोन क्रेन आणि अर्थमुव्हिंग मशीनची मदत घेण्यात आली. १५० तरुणांनी सतत ८ तास काम करून हा महाकाय रावण तयार केला आहे. पुतळ्याचे एकूण वजन ६२ क्विंटल आहे. त्यात ३ क्विंटल फायबर ग्लास, ४० क्विंटल लोखंड, १५ क्विंटल बांबू, २ क्विंटल प्लास्टिक दोर लागला असून ३ हजार मिटर तंबूचे कापड व २ हजार मीटर ज्यूट वापरले गेले आहे. या पुतळ्याची लिम्का बुक मध्ये नोंद केली गेली आहे.

पुतळ्यात २५ फुट उंचीचे १ हजार बांबू वापरले गेले आहेत. रावणाच्या पुतळ्यात फुल रिमोट कंट्रोल सिस्टीम बसविली गेली असून एक बटन दाबताच रावण दहन होणार आहे आणि त्यासाठी ४५ मिनिटे लागतील. हा पुतळा पाहायला खूप गर्दी होत आहे. पर्यावरणाला नुकसान पोचू नये म्हणून इको फ्रेंडली फटके वापरले जाणार आहेत.

Leave a Comment