गुगलच्या कमाईत 29 टक्क्यांनी वाढ, नफा 33 टक्क्यांनी वाढला

google
जागतिक सर्च इंजिन असलेल्या गुगलच्या भारतातील उलाढालीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 2017-18 या वर्षी वाढ झाली असून कंपनीची कमाई 29 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीचा नफा 33 टक्क्यांनी वाढून 407.20 कोटी रुपये झाला आहे.

यावर्षी गुगलची कमाई वाढून 9338 कोटी रुपये झाली हे. कंपनी भारतात क्लाऊड आणि पेमेन्टची उलाढाल वाढविण्याची योजना आखत असून या दोन्ही क्षेत्रांमध्ये अधिक गुंतवणूक करत आहे. कंपनीच्या एकूण उलाढालीत जाहिरातींचा वाटा 69 टक्के एवढा असून माहिती-तंत्रज्ञान आधारित सेवांचा वाटा 18 टक्के एवढा आहे.

कंपनीच्या ‘दि ईयर, नेक्स्ट ईयर’ (टीवायएनवायवाय) 2018 या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालातील अंदाजानुसार, डिजिटल जाहिरातींवरील खर्च 2018 मध्ये 30% ने वाढून 12,337 कोटी रुपये होईल.

गुगल भारततून मिळणाऱ्या माहितीचा वापर येथे तसेच दक्षिण आशियातील अन्य बाजारपेठांसाठी विशिष्ट उत्पादने तयार करण्यासाठी करीत आहे. एक वर्षापूर्वी गुगलने तेज हे अ अॅपदेखील लॉन्च केला होते. त्याला आता गुगलने मोबाईल पेमेंट आणि वाणिज्य अॅप म्हटले आहे सध्या या अॅपचे 2 कोटी 50 सक्रिय वापरकर्ते आहेत.

Leave a Comment