टॅब्लेट स्वरुपात येणार सॅमसंगचा फोल्डेबल स्मार्टफोन

foldeble
द. कोरियन जायंट इलेक्ट्रोनिक्स कंपनी सॅमसंगचा आगामी फोल्डेबल स्मार्टफोन टॅब्लेट स्वरुपात असेल आणि तो युजरच्या खिशात सहज मावू शकेल असे कंपनीचे सीइओ डीजे कोह यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे. सी नेट या वाहिनीला ते मुलाखत देत होते.

कोह म्हणाले हा फोन वापरासाठी तयार झाल्यावर तो जगभरातील सर्व देशात लाँच केला जाईल. तो टॅब्लेट स्वरुपात असेल आणि फोल्ड केल्यावर खिशात मावेल. या फोनला मोठा स्क्रीन दिला जाईल. तज्ञांच्या अंदाजानुसार या फोनसाठी ६.५ इंची स्क्रीन दिला जाईल. हा फोन गॅलेक्सी सिरीज मधील असेल आणि पुढच्या वर्षात मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस मध्ये सादर केला जाईल असाही अंदाज वर्तविला जात आहे. या फोनची किंमत १ लाख २५ हजार रुपयांच्या दरम्यान असेल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment