संभाजीराजे आहेत चविष्ट सांबाराचे जनक

sambar
केवळ दक्षिणात्याच नव्हे तर कोणत्याही हॉटेल मध्ये सर्रास मिळणारे चविष्ट सांबार आपण दक्षिणात्य इडली, डोसा, मेदुवडा या पदार्थांबरोबर चेपत असतो. हे सांबार मुळचे दक्षिणेकडचे असावे असा आपला ठाम समज असेल तर तो तपासून घ्यायला हवा. खाद्यपदार्थांची कुळे म्हजे त्यांचे मूळ शोधणाऱ्या तज्ञांच्या मते सांबार हे मुळचे महाराष्ट्रीयन आहे. काही जणांच्या मते शिवाजी महाराजांचे सुपुत्र आणि राजे संभाजी यांनी सर्वप्रथम सांबार बनविले असावे.

medu
याची कथा अशी सांगतात कि संभाजी राजे वीरपुरुष होते तसेच त्यांना नवनवीन पदार्थ बनविण्याची खास आवड होती. एकदा त्यांना भूक लागली मात्र त्यांचा नेहमीचा आचारी गैरहजर होता तेव्हा संभाजीराजांनी वरणात शिजताना चुकून चिंच घातली. पण त्यामुळे वरणाचा स्वाद अधिक वाढला. त्यांनीच या नव्या कृतीला सांबार असे नाव दिले. खाद्य इतिहासानुसार मराठे कालखंडा अगोदर सांबार अस्तित्वात नव्हते.

अर्थात या सांबारात अनेक कृती आहेत. आज ३० ते ४० प्रकारे सांबर बनविले जाते. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात त्यात वापरल्या जाणार्या भाज्या वेगळ्या असतात. तामिळनाडूत सांबार बनविताना सुके मसाले वापरले जातात तर कर्नाटकात ओला मसाला वापरला जातो.

Leave a Comment