आता फेसबुकवर टाकता येणार थ्री-डी फोटो

3d
कॅलिफोर्निया – आता आणखी एक नवे फीचर फेसबुकने आणले असून ज्यामुळे आता फेसबुकवर याचा वापर करून थ्री-डी फोटो टाकता येणार आहेत. आता हे सोशल मीडिया नेटवर्कने शक्य केले आहे. या फिचरची या आठवड्यापासून सुरुवात होईल.

खरेच वाटतील असे (रिअलिस्टीक) फोटो या नव्या फीचरच्या मदतीने काढता येणार आहेत. तसेच, ते फेसबुक न्यूज फीड आणि व्हीआरवर शेअरही करता येतील. फेसबुकच्या ब्लॉगवर सांगितल्यानुसार हे असे टूल आहे, ज्याचा वापर करून दोन वस्तूंमधील अंतर दाखविता (capture) येईल. तसेच, एखाद्या वस्तूपुढील जागा आणि पार्श्वभूमी यांच्यातील अंतर, खोली, हालचाल यांच्यावर अधिक फोकस करता येईल. यामुळे वस्तू अधिक स्पष्ट दिसण्यास मदत होईल.

पोट्रेट मोडसह योग्य प्रकारची ड्युएल-लेन्स थ्री-डी फोटोज् घेण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये असणे आवश्यक आहे. अशा लेन्सेस सध्या केवळ आयफोन ७+, आयफोन एक्सएस आदी महागड्या मोबाईलमध्येच उपलब्ध आहे. याचा वापर करून आता फेसबुकवर विविध कोनांतून, साधे स्क्रोल करून, पॅनिंग, टिल्टिंग करून काढलेले फोटो अपलोड, शेअर करता येतील. आजपासून फेसबुकची ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. आणखी काही दिवस याचे परीक्षण केले जाईल. काही आठवड्यांमध्ये हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध होईल.

Leave a Comment