सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात संभाजी महाराजांनंतर तूकाराम महाराजांची बदनामी

tukaram-maharaj
पुणे – संभाजी महाराजांबाबत सर्व शिक्षा अभियानाच्या समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात वादग्रस्त लिखाण असल्याचे वृत्त ताजे असतानाच आता तुकाराम महारांजाबाबत सर्व शिक्षा अभियानाच्या दुसऱ्या पुस्तकात आक्षेपार्ह उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. तुकाराम महाराजांबाबत ‘संतांचे जीवन प्रसंग’ या पुस्तकात वादग्रस्त उल्लेख असल्याची बाब समोर आली आहे. हे पुस्तक गोपीनाथ तळवलकर यांनी लिहिले आहे.

तुकाराम महाराजांची बायको फार रागीट. तोंडाला कुत्रे बांधावे ना तसे, तिच्या तोंडून कायम नेहेमी शिव्याच बाहेर यायच्या. ते आमचं येडं, असे आपल्या पतीला ती म्हणायची. पण मनाने फार प्रेमळ आणि पतिभक्त. काशी आणि महादू ही त्यांची मुले. असा उल्लेख या पुस्तकात आहे. दरम्यान संभाजी ब्रिगेडने या सगळ्यावर आक्षेप घेतला असून संत तुकाराम आणि संभाजी महाराजांची बदनामी सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकातून केली जाते आहे. चुकीची माहिती पुढे पसरवली जाते आहे. विद्यार्थ्यांपर्यंत अशा मजकुरांमधून चुकीचा संदेश पोहचतो आहे. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे. तसेच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा असेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment