स्कॉर्पियो आणि मराझो भाड्याने देणार महिंद्रा

mahindra
नवी दिल्ली – नुकतीच एक योजना देशातील मोठी अॅटो कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने जाहीर केली असून त्यानुसार पाच वर्षांसाठी महिंद्राच्या गाड्या भाड्याने घेता येणार आहेत. ज्या गाड्या महिंद्राकडून वापरण्यासाठी भाड्याने दिल्या जाणार आहेत, त्यात मिड साइझ एसयूव्ही स्कार्पियो, मराझो, XUV500, KUV100 आणि TUV300 यांचा समावेश असेल. त्यांची एक्स शोरूम किंमत १० ते १५ लाख रुपये आहे. पण कंपनी या गाड्या १३४९९ पासून ३२९९९च्या मासिक भाड्याने देणार आहे. विविध शहरांसाठी कंपनीकडून वेगवेगळे भाडे ठरवण्यात आले आहे.

सध्या फक्त दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, अहमदाबाद आणि पुण्यात महिंद्राची ही योजना लागू होईल. पण ही स्कीन कंपनीच्या वतीने देशातील १९ शहरांत लागू केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कंपनीच्या या प्रयत्नामुळे बाजारात नवीन ग्राहक येतील असे कंपनीचे म्हणणे आहे. त्यासाठी कंपनीने Global leasing Service Firms Orix आणि ALD Automotive शी करार केला आहे.

गाड्या लीजवर देतानाच त्याचे इंश्युरन्सही महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी करून देईल. गाडीच्या मेंटनन्सची जबाबदारी कंपनीची असेल. तसेच अपघात झाला तरी कंपनी २४ तासात गाडी रिप्लेस करून दुसरी गाडी देईल. याबाबत माहिती देताना महिंद्राचे चीफ फायनांशिअल ऑफिसर व्ही. एस पार्थसारथी म्हणाले की, कंपनीची ही स्कीम देशात एक नवे उदाहरण सादर करेल, असा मला विश्वास आहे. अशा प्रकारच्या स्कीममुळे कंपनी देशातील छोट्या व्यावसायिकांना फायदा पोहोचवण्याचा विचार करत असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Comment