दक्षिण कॅरोलीनाच्या सागरी किनाऱ्यावर सापडली रहस्यमयी वस्तू

beach
जगामध्ये अनेक ठिकाणी अनेकदा रहस्यमयी वस्तू आकाशातून उडताना पहिल्याच्या किंवा पाण्यातून वाहून आल्याच्या कितीतरी घटना प्रसिद्ध होत असतात. अशीच एक घटना दक्षिण कॅरोलीनाच्या सीब्रूक आयलंड येथे घडली. येथील सागरी किनाऱ्यावर समुद्रातीन एक प्रचंड गोलाकार वस्तू वहात आली आहे. ही वस्तू नेमकी काय आहे याचा अंदाज अजून तरी कोणी लावू शकलेले नसल्याने त्या बद्दल स्थानिक रहिवाश्यांचे निरनिराळे तर्क ऐकण्यास मिळत आहेत.
beach1
ही विचित्र आकाराची, काहीशी गोलाकार दिसणारी वस्तू सर्वप्रथम ‘लोकंट्री मरीन मॅमल नेटवर्क’ या समुद्री जलचरांच्या संरक्षणार्थ काम करणाऱ्या संस्थेच्या सदस्यांना सापडली. या भल्या मोठ्या वस्तूची छायाचित्रे त्यांनी त्वरित सोशल मिडीयावर शेअर करीत, त्यांना सापडलेली ही वस्तू नेमकी काय असावी याबद्दल नेटीझन्सना त्यांचे अंदाज वर्तविण्यास आग्रह केला होता. ही रहस्यमयी वस्तू समुद्रकिनाऱ्यावर सापडली असल्याची सूचना मिळताच स्थानिक प्रशासनिक अधिकाऱ्यांनी ही वस्तू त्यांच्या ताब्यात घेतली असली, तरी ही वस्तू नेमकी आहे तरी काय, या रहस्याची उकल अद्याप व्हायची आहे.
beach2
सोशल मिडीयावर प्रसिद्ध केल्या गेलेल्या छायाचित्रांमध्ये एक भली मोठी, गोलाकार वस्तू पहावयास मिळत आहे. ही वस्तू कॉन्क्रीट किंवा एखाद्या धातूने बनविली गेल्यासारखी दिसत असली, तरी एखाद्या फोम प्रमाणे ही वस्तू स्पर्शास मऊ, गुबगुबीत जाणवत आहे. या वस्तूची छायाचित्रे सोशल मिडीयावर शेअर केल्याच्या पंधरा तासांनंतर लोकंट्री मरीन मॅमल नेटवर्कच्या सदस्यांनी अश्याच आणखी एका वस्तूचे छायाचित्र सोशल मिडीयावर शेअर केले आहे.
beach3
ही वस्तू आधी सापडलेल्या वस्तूप्रमाणेच दिसत असून, आकाराने मात्र अर्धगोलाकार आहे. ही वस्तू दक्षिण कॅरोलिनाच्या कियावाह नामक द्वीपावर आढळली आहे. दरम्यान या वस्तू काय असाव्यात याबद्दल अनेक तर्क वितर्क व्यक्त केले जात असून, ‘नासा’ च्या एखाद्या अंतराळयानाचे हे भाग असण्याची शक्यता देखील नेटीझन्स वर्तवित आहेत.

Leave a Comment