झिका व्हायरस पासून असा करा बचाव

zika
राजस्थानमधील जयपूर शहरामध्ये बावीस लोकांना झिका व्हायरसची लागण झाली असून, आणखी अनेक रुग्ण या व्हायरसने ग्रासले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या व्हायरसची लागण झाल्ल्यावर दिसून येणारी लक्षणे, आणि यापासून आपला बचाव कसा करता येईल हे जाणून घेऊ या. झिका व्हायरसची लागण गर्भावती महिलांना झाल्यास, त्याचे दुष्परिणाम गर्भावर होण्याची शक्यता असते. तसेच नवजात अर्भकांमध्ये या व्हायरसची लागण झाल्यास त्यामुळे न्यूरॉलॉजिकल कॉम्प्लीकेशन्स उद्भविण्याची शक्यता असते. भारतातील हवामान झिका व्हायरसच्या एडीस इजिप्टाय डासांच्या प्रदुर्भावासाठी पूरक असून, याच डासांच्या प्रजातींमुळे डेंग्यू आणि चिकनगुन्या सारख्या रोगांची लागण होते. या रोगांना प्रतिबंधित करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे लसीकरण उपलब्ध नसल्याने हे रोग जास्तच झपाट्याने फैलावतात.
zika1
जर एखाद्या व्यक्तीला झिका व्हायरसची लागण झाली, तर त्या व्यक्तीला ताप येऊ लागतो. तापाबरोबरच अंगावर पुरळही दिसून येते. तसेच डोकेदुखी, सांधेदुखी, आणि अंगदुखी सतावू लागते. क्वचित केसेस मध्ये रुग्णाच्या डोळ्यांमध्ये देखील संसर्ग होऊ शकतो.( conjunctivisis ). क्वचित प्रसंगी हा रोग प्राणघातकही ठरू शकतो.
zika2
या व्याधीपासून बचाव करण्यासाठी अनेक उपायांचा अवलंब करता येऊ शकतो. सर्वप्रथम आपण राहत असलेल्या परिसरामध्ये डासांचा प्रादुर्भाव तर होत नाही ना याकडे लक्ष द्यावे. घराच्या आसपास साठलेल्या पाण्याचा त्वरित निचरा होण्याची व्यवस्था करावी. हौदांमध्ये किंवा टाक्यांमध्ये साठविलेले पाणी झाकून ठेवले जाईल याची खबरदारी घ्यावी. घराच्या बाहेर पडताना पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत. बाजारामध्ये अनेक तऱ्हेची डास प्रतिरोधक क्रीम्स, रोल-ऑन्स इत्यादी उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करावा. घराच्या आसपास डास येणार नाहीत अशी झाडे घरामध्ये आणि घराच्या आसपास लावावीत. (सिट्रोनेला, तुळस, लॅव्हेंडर इत्यादी )एडीस इजिप्टाय हा डास दिवसा चावणारा डास असल्याने घराच्या बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment