दारूच्या नशेत तळीराम दांपत्याने विकत घेतले चक्क हॉटेल

hotel
गेल्यावर्षी हनिमुनसाठी गिना लाऑन्स आणि मार्क ली हे जोडपे श्रीलंकेला गेले. पण या दोघांनी दारूच्या नशेत चक्क हॉटेल खरेदीचा व्यवहार करून टाकला. ते जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा आपण जवळपास २९ लाखांहून अधिक रुपयांचा व्यवहार केल्याचे त्यांच्या लक्षात आले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

सध्या सोशल मीडियावर दारूच्या नशेत हॉटेल खरेदी करुन या व्यवसायात उतरलेल्या गिना आणि मार्कची ही भन्नाट जोडी चर्चेचा विषय ठरली आहे. गिना आणि मार्क हे दोघेही डिसेंबर महिन्यात हनिमुनसाठी श्रीलंकेतील समुद्रकिनारी असलेल्या हॉटेलमध्ये थांबले. एका व्यावसायिकाने हे हॉटेल भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतले होते, पण त्याची मुदत संपत आली असल्याचे गिना आणि मार्कला कळले. हॉटेल मालकाकडे हॉटेल विकत घेण्याचा मानस हॉटेल परिसरात मद्यपान करत असलेल्या या जोडप्याने दारूच्या नशेत बोलून दाखवला.

२९ लाखांच्या आसपास या छोट्याश्या हॉटेलची किंमत असल्याचे त्यांना समजले. दोघांनी दारूच्या नशेत संपूर्ण व्यवहार पारही पाडले. पण आपण काय केले याची जाणीव दोघांना शुद्धीवर आल्यानंतर झाली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. अखेर पदरी पडले पवित्र झाले म्हणत या दोघांनी कोणताही अनुभव नसताना हे हॉटेल चालवायला घेतले. आता गेल्या काही महिन्यांपासून हे हॉटेल मुळचे लंडनमधील गिना आणि मार्क हे दोघेही चालवत आहेत.

Leave a Comment