सर्व्हेक्षण निकालाने फडणवीसांच्या डोळ्याला लागेना डोळा

devendra
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत आणि पुन्हा एकदा भाजप सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त करत आहेत. मात्र अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपने राज्यात नुकतेच एक गुप्त सर्व्हेक्षण केले असून त्याचा अहवाल पहिल्यापासून देवेंद्र फडणवीस याच्या डोळ्याला डोळा लागेना झाला आहे. म्हणजे या निकालामुळे मुख्यमंत्र्यांची झोप उडविली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील सर्व लोकसभा आणि विधानसभा क्षेत्रात हे गुप्त सर्वेक्षण केले गेले.यावेळी तीन प्रश्न विचारले गेले होते. सध्याचे सरकार तुम्ही पुन्हा निवडून देणार का, आमदार खासदारांच्या कामाबाबत समाधानी आहात का आणि या सरकारला अजून एक संधी दिली पाहिजे असे तुम्हाला वाटते का? या प्रश्नांना मिळालेल्या उत्तरांवरून जो अहवाल तयार झाला त्यानुसार भाजपचे ८ खासदार आणि ४० आमदार पुन्हा निवडून येण्याची शक्यता नाही.

२०१४ च्या मोदी लाटेत महाराष्ट्रात प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री बनला होता. मात्र गेल्या ४ वर्षात मोदी लाट ओसरली आहे. फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून काम समाधानकारक असले तरी शिवसेनेचा स्वबळावर लढण्याचा निर्णय आणि अन्य आमदारांची सुमार कामगिरी यामुळे आगामी निवडणुका वाटतात तितक्या भाजपसाठी सोप्या नाहीत हे या सर्वेक्षणावरून दिसून आले आहे. या संदर्भात फडणवीस यांनी पक्षाच्या दादर येथील कार्यालयात आमदारांची तातडीची बैठक घेतली असल्याचे समजते.

Leave a Comment