डोनाल्ड ट्रम्प पुतळ्याखाली मजकूर-माझ्यावर लघवी करा

putala
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक पुतळा सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चेत असून या पुतळ्याच्या खाली माझ्यावर लघवी करा असा मजकूर आहे. ट्रम्प हा सध्या जगातील सर्वाधिक चर्चेत असलेला चेहरा आहे. कधी अपंगांची चेष्टा, कधी स्थलांतरित बाबत वादग्रस्त विधाने यामुळे तर चर्चेला ते खुद्द मसाला पुरवत असतात. आता त्यांचा पुतळाही चर्चेत आला आहे.

न्यूयॉर्कच्या ब्रुकलीन भागात हा अर्धपुतळा फील गोबील या व्यक्तीने बसविला आहे. पुतळ्यातील ट्रम्प यांचा चेहरा ते ८०-९० च्या दशकात जसे दिसत असत तसा दिसतो आहे. गोबील याच्या म्हणण्यानुसार त्याने हा पुतळा त्याच्या मनातील खासगी भावना आणि लोकांच्या मनातील विचार उघड करावेत यासाठी बसविला असून असे करण्याचा त्याला लोकशाहीतील नागरिक म्हणून पूर्ण अधिकार आहे. तो म्हणतो कुत्री शु साठी या पुतळ्याचा वापर करण्याची भीती आहे पण कुत्रीही अतिशय समजूतदार असतात असे मला वाटते.

या पुतळ्याचे फोटो आणि त्याखालचा मजकूर व्हायरल झाल्यावर अनेक लोकांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत असेही समजते.