घरी चार्ज करता येणार ओकिनावाची नवी रिज प्लस स्कूटर

ridge
ओकिनावा ऑटोटेक कंपनीने त्यांची नवी इलेक्ट्रिक स्कूटर रिज प्लस नावाने बाजारात आणली असून तिची किंमत ६४९८८ रुपये आहे. या स्कूटरला रीमुव्हेबल बॅटरी देण्यात आली असून त्यामुळे बॅटरी काढून ग्राहक ती घराच्या घरी चार्ज करू शकणार आहेत. एकदा चार्ज केल्यावर हि स्कूटर १२० किमी जाते आणि तिचा टॉप स्पीड आहे ताशी ५५ किमी.

या स्कूटरला वॉटरप्रुफ ८०० वॅटची मोटर दिली गेली आहे. शिवाय अँटी थेप्ट अलार्म, किलेस एन्ट्री, फाईंड माय स्कूटर फंक्शन, ट्यूबलेस टायर, टेलेस्कोपिक सस्पेन्शन अशी फीचर्स आहेत. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र शर्मा म्हणले स्कूटरची बॅटरी मायक्रोचार्जर अश आहे तसेच स्कूटरला ऑटोकट फिचर दिले गेले आहे त्यामुळे ती सतत दोन तास चालविता येईल. ऑक्टोबर मध्ये ५०० तर नोव्हेंबरमध्ये १५०० गाड्या बाजारात आणल्या जाणार आहेत.