खाण्याची कल्पना करणेही अशक्य असे पदार्थ ‘डीस्गस्टिंग फूड म्युझियम’मध्ये

sood
या संग्रहालयामध्ये निरनिराळे खाद्यपदार्थ प्रदर्शित केले जाणार असले, तरी हे खाऊन पाहण्याची इच्छा तुम्हाला होणे केवळ अशक्य आहे. आपण कल्पनाही करू शकणार नाही असे खाद्यपदार्थ या ठिकाणी असणार आहेत. मग जिथे कल्पनाच केली जाऊ शकत नाही, तिथे ते पदार्थ खाऊन पाहणे तर दूरच. अळ्या पडलेल्या चीझपासून ते भल्या मोठ्या शार्क माशाचे सडत असलेले मांस असे अनेक प्रकार या ठिकाणी पहावयास मिळणार आहेत. हे पदार्थ पाहून किळस येणे स्वाभाविकच आहे, आणि पदार्थ जिथे प्रदर्शित केले गेले जाणर आहेत, त्या संग्रहालयाचे नावच मुळी ‘डीस्गस्टिंग फुड्स म्युझियम’, म्हणजे किळसवाण्या पदार्थांचे संग्रहालय असे आहे.
food1
येत्या ३१ ऑक्टोबर रोजी हे म्युझियम स्वीडन देशामध्ये सुरु होत असून, जगभरातील सर्वात ‘किळसवाणे’ खाद्यपदार्थ या ठिकाणी प्रदर्शित केले जाणार आहेत. दक्षिण-पूर्वी आशियामध्ये होणाऱ्या दुरीयन नामक भयानक उग्र वासाच्या फळापासून आईसलंडची खासियत समजल्या जाणाऱ्या शार्क माश्याच्या सडलेल्या मांसापर्यंत निरनिराळे खाद्यपदार्थ या संग्रहालयामध्ये पहावयास मिळणार आहेत. जगभरामध्ये कोणते पदार्थ कश्या प्रकारे खाल्ले जातात हे लोकांना समजावे, आणि ज्या पदार्थांची आपण कल्पना देखील करू शकत अन्ही, असे पदार्थ एखाद्या देशाची खासियत देखील असू शकतात हे मान्य करण्याची मानसिकता लोकांमध्ये निर्माण व्हावी हे या संग्रहालयाच्या निर्माणामागील उद्दिष्ट आहे.
food2
‘लोनली प्लॅनेट’ ने दिलेल्या वृत्तानुसार या संग्रहालयामध्ये जगभरातील एकूण ऐंशी किळसवाणे पदार्थ प्रदर्शित केले जाणार आहेत. यामध्ये सार्डिनीयाची खासियत असलेले अळ्या पडलेले चीझ, स्वीडनची खासियत असलेला लोणच्याप्रमाणे मुराविलेला हेरिंग जातीचा मासा, चीनचे ‘स्टींकी टोफू’ हे अतिशय उग्र वासाचे टोफू, पेरू देशाची खासियत असलेली, भट्टीमध्ये भाजलेली गिनिपिग्ज, इत्यादी पदार्थांचा समावेश असणार आहे.

Leave a Comment