नागराज मंजुळेच्या आगामी ‘नाळ’चा टीझर रिलीज

nagraj-manjule
नुकताच झी स्टुडिओ आणि नागराज मंजुळे यांच्या ‘आटपाट’ निर्मिती संस्थेच्या आगामी ‘नाळ’ चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात नागराज मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर छायाचित्रकार सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

एक शेवरी टीझरच्या सुरुवातीलाच हवेत उडताना दिसते. ही शेवरी अखेरीस नदीत आंघोळ करणाऱ्या एका चिमुरड्याजवळ येते, पण ती पकडण्याच्या नादात त्याच्या हातून निसटते, असे ‘नाळ’ चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. पण या टीझरमध्ये नागराजचे दर्शन घडत नाही. चित्रपटामध्ये नागराजसोबत कोणते कलाकार आहेत, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. नाळ चित्रपट १६ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.