राजकुमार-श्रद्धाच्या ‘स्त्री’ने जमवला सव्वाशे कोटींचा गल्ला

stree
सर्वच समिक्षकांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेता राजकुमार रावच्या अभिनयाचे तोंडभरुन कौतुक केले आहे. त्याचा अलिकडचा ‘स्त्री’ हा चित्रपट जबरदस्त यश मिळवत असल्यामुळे त्याचे उज्वल भविष्य तयार झाले आहे. बॉक्स ऑफिसवर हॉरर कॉमेडी असलेल्या ‘स्त्री’ चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने आजवर तब्बल १२५ कोटींची कमाई केली आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनाला महिना उलटल्यानंतरही प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवलेली नाही. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची घोडदौड सुरुच आहे. मोठे बजेट असलेल्या ‘सुई धागा’ आणि ‘बत्ती गुल मिटर चालू’ या चित्रपटांनाही जबरदस्त टक्कर ‘स्त्री’ने दिली आहे.